चिवडा
दिवाळी फराळातील महत्वाचा पदार्थ म्हणजे चिवडा. चिवड्याशिवाय दिवाळी फराळ अपूर्ण होईल. चिवड्यातील मुख्य घटक म्हणजे पोहे. या पोह्यांचा उल्लेख पुरातण काळापासून आढळतो. भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याने आणलेले पोहे खाल्ले होते.
पोह्यांचे अनेक प्रकार आहेत. महाराष्ट्रात घराघरत नेहमी केला जाणारा
पातळ पोह्याचा चिवडा लोकप्रिय आहे. चुरमुरे पोहे मिक्स किंवा नुसता चिरमुर्याचा चिवडा, भडंग पण खूप आवडीने खाल्ला
जातो.
दिवाळीत व लग्नकार्यात आवर्जुन भाजक्या पोह्यांचा चिवडा केला जातो.
किंवा जाड पोहे तळूनपण त्याचा चिवडा बनवतात. आता बाजारात चिवड्यासाठी डझनांनी पोह्याचे
प्रकार उपलब्ध आहेत. जसे की पातळ पोहे, जाड पोहे, टिकली पोहे, नायलॉन पोहे, रेशीम पोहे, गहू व ज्वारीचे पोहे, मक्याचे पोहे इत्यादी. भाजक्या पोह्यातही दोन
तीन प्रकार आले आहेत.
चिवडा हा प्रकार
आपल्याकडे लोकप्रिय आहे तो त्याच्या गुणधर्मामुळे. जसे की - 1) एकदा करुन ठेवला की
अनेक दिवस टिकतो, 2) पोटभरीचा आहे, 3) आयत्यावेळी काही खायला
लागले व करायला वेळ नसला की घरातील तयार चिवडा हा एक उत्तम पर्याय आहे, 4) दूरच्या प्रवासात न्यायला सोपा, 5) सुरुवातीला करतांनाची
चव अनेक दिवस जशीच्या तशी राहते.
असा चिवडा करयला
साधा व सोपा वाटला तरी पोहे भाजण्यापासूनच्या अनेक गोष्टींवर त्याची चव व कुरकुरीतपणा
अवलंबून आहे. परफेक्ट खमंग चिवड्यासाठी काही टिप्स देत आहे.
1. पातळ पोहे थोडेसे भाजून घ्यावे, जास्त
जर भाजण्यात आले तर चिवडा कडकडीत लागतो,
2. पोह्यसोबत चुरमुरे वापरणार असाल तर फोडणीत मसाले घालून झाले
की त्यावराच चुरमुरे घालावेत म्हणजे चुरमुर्यात मसाले, तिखट, हळद व्यवस्थित मिक्स होते व चुरमुर्यात काही दमटपणा / चिवटपणा असेल तर तोही
निघून जाईल.
3. चिवड्यात जर कांदा घालायचा असेल तर उभे काप करुन दोन दिवस
आधीच उन्हात किंवा घरातच सुकवावे म्हणजे लवकर तळल्या जातील.
4. कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर
असे जिन्नस त्याचा ओलसरपणा जाईपर्यंत तेलात परतावे.
5. चिवड्याच्या फोडणीत खालील प्रमाणे साहित्य घालावे.
a) तेल, b) मोहरी व जिरे, c) शेंगदाणे, d) हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, e) डाळवं, f) खोबर्याचे काप, काजू वगैरे, g) हिंग, h) धणे जिरे पुड किंवा चिवडा मसाला, i) तिखट मिठ शेवटी घालावे म्हणजे जळणार नाही. नंतर त्यात
पोहे मिक्स करावे, तेव्हाच पिठी साखर व चिमुटभर लिंबूसत्व पावडर
पोह्यावर घालावी म्हणजे छान मिक्स होईल.
6. मध्यम आचेवरच सर्व साहित्य तळून घ्यावे. शेंगदाणे व खोबर्याचे
काप करपणार नाहीत याची काळजी घ्यावी.
7. पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात चिवडा भरून ठेववा म्हणजे
अनेक दिवस कुरकुरीत राहिल.
अशा पद्धतीने बनवलेला
चिवडा हमखास चांगलाच होईल व बरेच दिवस टिकेल.
पातळ पोह्याच्या व भाजक्या पोह्याच्या चिवड्याची रेसिपी माझ्या
‘ Varshas House of Foods’ या युट्युब चॅनलवर अपलोड केलेले
आहेत.
पातळ पोह्याचा चिवडा : https://www.youtube.com/watch?v=agg6Z8WpSZo
भाजक्या पोह्याचा चिवडा : https://www.youtube.com/watch?v=nEHA2zfEUWk
<script data-ad-client="ca-pub-1746575545851118" async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>
धन्यवाद.
वर्षा कंधारकर.

Comments
Post a Comment