चिवडा
दिवाळी फराळातील महत्वाचा पदार्थ म्हणजे चिवडा. चिवड्याशिवाय दिवाळी फराळ अपूर्ण होईल. चिवड्यातील मुख्य घटक म्हणजे पोहे. या पोह्यांचा उल्लेख पुरातण काळापासून आढळतो. भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याने आणलेले पोहे खाल्ले होते. पोह्यांचे अनेक प्रकार आहेत. महाराष्ट्रात घराघरत नेहमी केला जाणारा पातळ पोह्याचा चिवडा लोकप्रिय आहे. चुरमुरे पोहे मिक्स किंवा नुसता चिरमुर्याचा चिवडा , भडंग पण खूप आवडीने खाल्ला जातो. दिवाळीत व लग्नकार्यात आवर्जुन भाजक्या पोह्यांचा चिवडा केला जातो. किंवा जाड पोहे तळूनपण त्याचा चिवडा बनवतात. आता बाजारात चिवड्यासाठी डझनांनी पोह्याचे प्रकार उपलब्ध आहेत. जसे की पातळ पोहे , जाड पोहे , टिकली पोहे , नायलॉन पोहे , रेशीम पोहे , गहू व ज्वारीचे पोहे , मक्याचे पोहे इत्यादी. भाजक्या पोह्यातही दोन तीन प्रकार आले आहेत. चिवडा हा प्रकार आपल्याकडे लोकप्रिय आहे तो त्याच्या गुणधर्मामुळे. जसे की - 1) एकदा करुन ठेवला की अनेक...