Posts

चिवडा

Image
                 दिवाळी फराळातील महत्वाचा पदार्थ म्हणजे चिवडा. चिवड्याशिवाय दिवाळी फराळ अपूर्ण होईल. चिवड्यातील मुख्य घटक म्हणजे पोहे. या पोह्यांचा उल्लेख पुरातण काळापासून आढळतो. भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याने आणलेले पोहे खाल्ले होते.       पोह्यांचे अनेक प्रकार आहेत. महाराष्ट्रात घराघरत नेहमी केला जाणारा पातळ पोह्याचा चिवडा लोकप्रिय आहे. चुरमुरे पोहे मिक्स किंवा नुसता चिरमुर्‍याचा चिवडा , भडंग पण खूप आवडीने खाल्ला जातो.       दिवाळीत व लग्नकार्यात आवर्जुन भाजक्या पोह्यांचा चिवडा केला जातो. किंवा जाड पोहे तळूनपण त्याचा चिवडा बनवतात. आता बाजारात चिवड्यासाठी डझनांनी पोह्याचे प्रकार उपलब्ध आहेत. जसे की पातळ पोहे , जाड पोहे , टिकली पोहे , नायलॉन पोहे , रेशीम पोहे , गहू व ज्वारीचे पोहे , मक्याचे पोहे इत्यादी. भाजक्या पोह्यातही दोन तीन प्रकार आले आहेत.       चिवडा हा प्रकार आपल्याकडे लोकप्रिय आहे तो त्याच्या गुणधर्मामुळे. जसे की - 1) एकदा करुन ठेवला की अनेक...

दिवाळी फराळाची पूर्व तयारी

Image
        दिवाळीत फराळाची जर आधीपासून तयारी आणि नियोजन केले तर ऐनवेळी गडबड अन तारांबळ होणार नाही. सर्वसाधारण प्रत्येक घरात जे पदार्थ केले जातात त्यानुसार इथे काही गोष्टी सुचवते.       सर्वप्रथम किराणा सामान घरी भरुन ठेवावे. दिवळीपूर्वी कमीताकमी तीन आठवडे हे सामान आधी आणले तर हळू हळू गृहिणीला तयारीला सुरुवात करता येईल. नाहीतर काहीवेळेस अगदी गॅसपाशी फराळ करणे सुरु झाल्यावर काही जिन्नस घरात नाही हे कळते.       त्यासाठी वाणसामान लिस्ट देत आहे – साखर , गुळ , शेंगदाणे , डाळवं , तीळ , बारीक रवा , मैदा , चनाडाळ आणि बेसन , खोबरे , जाड व पातळ पोहे , मक्याचे पोहे , चुरमुरे , भाजके पोहे , तेल , तूप , धने , जीरे , ओवा , लवंग , दालचिनी , तेजपत्ता , विलायची , जायफळ , खसखस , तयार चिवडा मसाला , व गोड पदार्थात घालायचे सुके मेवे – काजू , बदाम , पिस्ते , चारोळी , मनुका इ. करंजीच्या साठ्यात लावण्यासाठी कॉर्नफ्लॉवर पावडर आणि रेडीमेड गुलाबजामुनचे मिक्स व मिल्क पावडर.        रोजच्या स्वै...

दिवाळी फराळ - चकली

Image
                   सर्वप्रथम सर्वांना ‘ वर्षाज हाऊस ऑफ फुड्स ’ तर्फे दिवाळीसाठी हार्दिक शुभेच्छा! 2020 हे वर्ष जवळपास सर्वांनाच खूप कठिण गेले आहे. करोना व इतर सर्व संकटापासून लवकर सुटका होवो व येणारा काळ सर्वांना सुख समृद्धी व भरभराटीचा जावो ही प्रभूचरणी प्रार्थना करुन मी माझ्या या पहिल्याच ब्लॉगला आज सुरुवात करीत आहे.       अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली दिवाळीच्या फराळाची परंपरा आहे. या दिवसात असलेल्या सुंदर वातावरणात फराळाला फार महत्व आहे. या काळात मित्र परिवार व नातलग एकत्र जमत असल्यामुळे वेगवेगळ्या पदार्थांची फराळासाठी घराघरात रेलचेल असते. कितीही काळ बदलला , पाश्चात्यांचे अनुकरण झाले , तरीही या पास्ता-बर्गर-पिझ्झा-नुडल्सच्या जमान्यात भरपूर टिकणारे खमंग व चविष्ट असे पारंपारिक पदार्थ मात्र खूप आवडीने खाल्ले जातात. तर याच फराळातील एकेका पदार्थाबद्दल इथे माहिती देत आहे. दिवाळीच्या फराळातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा पदार्थ म्हणजे चकली. चकली परफेक्ट  बनवण्याच्या काही टिप्स.. चकली : हा एक महाराष्ट्रीयन...